लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विमानप्रवास करण्यापूर्वीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी, यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांसाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने गुरुवारी ‘डिजीयात्रा’ हे ॲप सुरू केले आहे. या ॲपमुळे विमान प्रवासासाठी प्रवाशाचा चेहरा हाच त्याचा बोर्डिंग पास ठरणार आहे. नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे ॲप लाँच केले.
विमानतळावरील प्रत्येक चेक पॉइंटवर चेहऱ्याच्या आधारे प्रवाशांची ओळख पटल्यानंतर प्रवेश मिळेल. विमानतळावरील प्रवेश, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग या तीन ठिकाणी ॲपद्वारे ओळख पटविण्यात येईल. यामुळे सुरक्षा यंत्रणा चोख होईल आणि खऱ्या प्रवाशालाच प्रवेश मिळेल.
कशी पटते ओळख?ही एक बायाेमेट्रिक यंत्रणा आहे. चेहरा, डाेळे आणि ओठांच्या ठेवणीवरुन व्यक्तीची ओळख पटविण्यात येते. nहे तिन्ही घटक स्कॅनरद्वारे रीड केले जातात. त्यातून चेहऱ्याची एक ३डी प्रतिमा तयार हाेते. ती एका डेटाबेसमध्ये साठविली जाते. या तंत्रज्ञानाचा शाेध अमेरिकेतील तज्ज्ञांनी लावला हाेता.
डिजीयात्रा ॲपचा उद्देशnविमानतळावरील लांबच लांब रांगांपासून मुक्ती मिळविणे.nकागदपत्रे आणि हार्ड कॉपी यांपासून मुक्ती मिळविणे.n‘नो फ्लायर लिस्ट’मधील प्रवाशांना ओळखणे होणार आणखी सोपे.
असे वापरले जाणार डिजीयात्रा ॲप
nॲप डाउनलोड करून सर्व तपशील भरा.nओटीपीद्वारे एकदा पडताळणी केल्यानंतर ॲप वापरास तयार होईल.nजेव्हा-जेव्हा प्रवास कराल, तेव्हा वेब चेक-इन करून तिकीट ॲपवर अपलोड करावे लागेल.nएअरपोर्टवर गेल्यावर ॲप स्कॅनरवर ठेवून चेहरा स्कॅन केला की प्रवेश होईल.nदुसऱ्या टप्प्यात सुरक्षेसाठी चेहरा स्कॅन करावा लागेल.nविमानात चढतानाच चेहरा स्कॅन होईल.
पहिल्या टप्प्यात या ठिकाणी अंमलबजावणीया ॲपची अंमलबजावणी सर्वप्रथम दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी येथे होईल. मार्च २०२३ पासून दुसऱ्या टप्प्यात गया, विजयवाडा, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे येथे ॲपची अंमलबजावणी होईल. तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशात ते लागू केले जाईल. सुविधा देऊन संपूर्ण प्रक्रिया कागदविहीन करणे हा या ॲपचा उद्देश आहे.