सुनील चावके
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंबंधात याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २८ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी देण्यात आलेली ही तिसावी तारीख आहे. नव्या तारखेमुळे राज्यात नजीकच्या भविष्यात पहिली निवडणूक लोकसभेचीच होण्याची शक्यता आहे.
ही याचिका २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सुनावणीच्या नव्या तारखेमुळे या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षे पूर्ण होतील. एकूण दहा न्यायमूर्तींपुढे या प्रकरणाची तब्बल तीस तारखांवर सुनावणी झाली आहे.
आमदार अपात्रतेची सुनावणी लांबली
शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.