शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 6:13 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबरकसून या आखाड्यात उतरले आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विवीध प्रकारची आश्वासने आणि घोषणा देत आहेत. यातच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बंटोगे तो कटोगे’ ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नाही, तर ही घोषणा आता गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.

गुजरातमधील भावनगर येथील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्न पत्रिकेवर हा नारा अथवा ही घोषणा छापली आहे. याशिवाय कार्डवर पीएम मोदी आणि सीएम योगींच्या फोटोसह स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी हे लग्न होणार आहे. या अनोख्या कार्डमुळे हे लग्न चर्चेत आले आहे.

महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान हिंदूंना एकत्र करण्यासाठी ‘बंटोगे तो कटोगे’ अशी घोषणा दिला होता. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही या घोषणेची चर्चा होत आहे. ही घोषणा लग्नपत्रिकेवर छापणाऱ्या कार्यकर्त्याने यासंदर्भात आपले मतही व्यक्त केले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, "लोकांना जागरूक करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लग्न पत्रिकेवर ही घोषणा छापल्याचे त्याने म्हटले आहे.

तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाmarriageलग्न