शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आता स्मारकेच आहेत हुतात्मा होण्याचा मार्गावर

By admin | Published: September 07, 2014 10:27 PM

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : मातृभूमीसाठी प्राणाहुती देणाऱ्यांची उपेक्षा

कोरेगाव : जुलमी राज्यकर्त्यांच्या तावडीतून मातृभूमीला सोडविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा त्याग व बलिदानाची आठवण भावी पिढीला सदैव राहावी, यासाठी महाराष्ट्रात २०६ हुतात्मा स्मारकांची निर्मिती करण्यात आली; पण शासनाने या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने आज राज्यातील बहुतांश स्मारके हुतात्मा होण्याच्या मार्गावर आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे हौतात्म्य चळवळीस प्रेरणादायी ठरले. गोवा मुक्ती संग्रामात ज्या शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या चिरंतन स्मृतींसाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी राज्यात या हुतात्म्यांची स्मारके उभारली. यातील बरीच स्मारके शासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्म्यांच्या शौर्यकथा सांगण्याऐवजी बकाल बनत आहेत. जिल्ह्यातील बहुतेक स्मारके दुरुस्तीअभावी पडून आहेत. २० जुलै १९८३ च्या शासकीय आदेशानुसार हुतात्मा स्मारकांची देखभाल व परीक्षणाचे काम ग्रामीण भागात जिल्हा परिषद व शहरी भागात महापालिका किंवा नगरपालिका यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मात्र स्मारकांच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही.याच अध्यादेशाद्वारे शासनाने जिल्हास्तरावर जिल्हा हुतात्मा स्मारक समितीची स्थापना केली असून स्मारकांची देखभाल व दुरुस्तीबाबतचे परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतात. जिल्ह्यातील दोन-तीन स्मारके सोडली तर बाकींच्या स्मारकांची दुरवस्था आहे. सध्या वर्धनगड येथील हुतात्मा स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विद्युत उपकरणे व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. काही स्मारकांच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. तसेच प्रवेशद्वारासमोरील बांधकाम उखडले असून सभोवताली पत्रे तुटून पडले आहेत. याबाबत शासनाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्मारके मोडकळीस आली आहेत. दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा वापर झाल्याचे दिसत नाही. मुक्तीसंग्रामात प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचीही हेळसांड शासनाकडून होत आहे. जिल्ह्यातील बरेच जण स्वातंत्र्यसैनिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांनी वास्तविक शासनाच्या सवलतींसाठी लढ्यात भाग घेतला नव्हता, तर मातृभूमीविषयीच्या प्रेमापोटी स्वत:ला लढ्यात झोकून दिले होते. परंतु शासनाने या योजनांच्या लाभासाठी वेगवेगळे निकष ठेवून स्वातंत्र्यसैनिकांची जणू चेष्टाच केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांनाही मागण्यासाठी निवेदने देऊन उपोषण, आंदोलने करावी लागतात हा तर स्वातंत्र्यसैनिकांचा अवमानच होय. (प्रतिनिधी)अपवाद फक्त कोरेगावचा...कोरेगाव शहरात हमरस्त्यावर असलेले हुतात्मा स्मारक हे प्रशासन आणि रोटरी क्लबच्या समन्वयामुळे आज सुस्थितीत आहे. जिल्हा प्रशासनाने केलेले सहकार्य आणि शहरवासियांची आस्था यामुळे या स्मारकाचे रुपडे पालटले आहे. आज विविध कार्यक्रमांसाठी या स्मारक आवाराचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याची नियमित देखभाल-दुरुस्तीही होते. रोटरी क्लबने स्वतंत्र कर्मचारी नेमल्याने स्मारकाने कात टाकली आहे. प्रशासनाने कोरेगाव पॅटर्नच्या धर्तीवर स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकास साधावा, अशी मागणी होत आहे.