गुजरातमधील सुरत महानगरपालिकेतून एका धक्कादायक घोटाळा उघड झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्या नसबंदीबाबत माहितीच्या अधिकारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
अधिकृत आरडेवारीनुसार सूरत महानगरपालिकेमध्ये २७०० भटके कुत्रे आहेत. मात्र सूरत महानगपालिकेने ३० हजार कुत्र्यांची नसबंदी केली आहे. प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी १४०३ रुपये देण्यात आले. म्हणजेच कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तीन कोटी रुपये खर्च केले गेले. सूरतमधील आरटीआय कार्यकर्ते संजय इझावा यांनी ही माहिती माहितीच्या अधिकारातून मिळवली.
मात्र आता शहरात २७०० कुत्रे असताना महानगरपालिकेने ३० हजार कुत्र्यांचं निर्बिजिकरण कुठून केलं, असा प्रश्नही उपस्थित केला जाच आहे. आरटीआय कार्यकर्त्यांनी सूरत महानगपालिकेकडे मागितलेल्या माहितीमध्ये २०१८ पासून २०२३ पर्यंतच्या पाच वर्षांमध्ये २७०० कुत्रे असल्याचे सांगण्यात आले. मात्र निर्बिजिकरण केलं गेलं.
या प्रकरणी सूरत महानगपालिकेच्या अॅडिशनल मार्केट सुपरिटेंडेंट यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, सूरत शहरामध्ये ८० ते ९० हजार कुत्रे असतील. मागच्या वर्षी आम्ही ३० हजार कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका दिला होता, तो पूर्ण केला. मागच्या महिन्यात नव्याने ३० हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमचं पथक दररोज प्रभागनिहाय निघतं आणि भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बिजिकरण करतं. अधिकृतपणे २७०० कुत्रे असताना ३० हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरण करण्यात आल्याच्या आरटीआयमधून झालेल्या उलगड्यानंतर डॉ. राकेश घेलानी यांनी सांगितलं की, ते काम सेंसर डिपार्टमेंड करतं, हे कसं झालं याबाबत आम्हाला माहिती नाही.