शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही, १ जूनपासून लागू होणार नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:08 PM

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

नवी दिल्ली : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आरटीओत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

किती शुल्क लागणार? लर्निंग लायसन्स :    १५० रुपयेलर्निंग लायसन्स चाचणी शुल्क :     ५० रुपयेड्रायव्हिंग टेस्ट शुल्क :     ३०० रुपयेड्रायव्हिंग लायसन्स :     २०० रुपयेलायसन्स नूतनीकरण :     २०० रुपयेदुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स :     ५०० रुपये

नवे नियम- किमान १ एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी २ एकर)- ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठीपुरेशी सुविधा- प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्णव पाच वर्षांचा अनुभव असावा- हलक्या वाहनांसाठी ४ आठवड्यात २९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी   २१ तास प्रात्यक्षिक)- अवजड वाहनांसाठी ६ आठवड्यात ३९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी   ३१ तास प्रात्यक्षिक)

आणखी कोणते नवे नियम लागू होणार? जुने वाहने बाद :  प्रदूषण करणारे सुमारे ९ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल २५ हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.   सुलभ अर्ज प्रक्रिया : लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.

कागदपत्रां साठी https://parivaha- .gov.i- /. या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस