शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता आझम खान, मेनका गांधींवरही प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 09:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे.

लखनऊ : आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर अनुक्रमे 72 आणि 48 तासांची बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी कडक पाऊले उचलली आहेत. भाजपाच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे. तर आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. यामुळे आझम खान यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. तर त्यांच्याविरोधात मोठा मोर्चा काढण्याची तयारीही भाजपा करत आहे. 

निवडणूक आयोगाने आझम खान यांच्यावर कारवाई करताना 72 तासांची प्रचारबंदी केली आहे. ही बंदी मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. तर मेनका गांधी यांच्यावर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे. मेनका यावेळी सुल्तानपूरमधून उमेदवार आहेत. 

योगी, मायावतींवरही कारवाई जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपच्या प्रमुख मायावती यांची शब्दांत निर्भत्सना करत, यांच्यावर प्रचारबंदी लागू केली. योगींवरील प्रचारबंदी ७२ तासांची (तीन दिवस) तर मायावतींवरील बंदी ४८ तासांची (दोन दिवस) असेल. बंदी मंगळवार सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल. या काळात त्यांना सभा, मिरवणुका, रोड शोद्वारे प्रचार करता येणार नाही. प्रसिद्धी व समाजमाध्यमांतूनही निवडणुकीशी संबंधित वक्तव्ये करता येणार नाहीत.

मेरठमधील सभेत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचा उल्लेख ‘हिरवा विषाणु’ असा केला होता व अलीला नव्हे, तर बजरंगबलीला मते देण्याचे आवाहन केले होते. मायावती यांनी सहारनपूरमध्ये सर्व मुस्लिमांनी या मुस्लीम उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन केले होते. आयोगाने नोटिसा काढताच दोघांनीही सारवासारव करणारी उत्तरे दिली, पण वक्तव्ये केल्याचा इन्कार केला नाही. आयोगाने दोघांच्याही भाषणांचे व्हिडीओ पुन्हा पाहिले व अशी वक्तव्ये केल्याची खात्री करून घेतली.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Jaya Pradaजया प्रदा