नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत एक चांगली बातमी आहे. रशियन लस स्पुटनिक लाइटला (Sputnik Light) तिसऱ्या टप्प्यातील ब्रिजिंग ट्रायलसाठी भारतात मंजुरी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतीय लोकांवर लसीच्या चाचणीला ग्रीन सिग्नल दिला आहे. DCGI च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने नुकतीच स्पुटनिक लाइटच्या चाचणीची शिफारस केली होती. स्पुटनिक लाइट ही एकच डोस लस आहे. (now there will be protection from corona in one dose sputnik light gets permission for phase 3 trial in india)
DCGI ने भारतीयांवर स्पुटनिक लाइटच्या फेज -3 ब्रिजिंग ट्रायलला परवानगी दिली आहे. यापूर्वी जुलैमध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी ऑफ द सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO)स्पुटनिक लाइटला आपत्कलीन वापरण्यास परवानगी नाकारली होती. CDSCO ने रशियन लसीची स्थानिक चाचणी आवश्यक असल्याचे म्हटले होते.
कमिटीला आढळले होते की, स्पुटनिक लाइट, स्पुटनिक Vच्या कंपोनेंट -1 डेटा सारखाच आहे. तसेच, भारतीय लोकांमध्ये त्याची सुरक्षा आणि रोगप्रतिकार क्षमता डेटा चाचणीमध्ये आधीच प्राप्त झाला होता. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीने गेल्या वर्षी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) सोबत भारतात स्पुटनिक V च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करार केला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोविड -19 च्या विरूद्ध स्पुटनिक लाइटने 78.6-83.7 टक्के प्रभाव असल्याचे दर्शविली आहे. ही दोन डोस असलेली लस अनेक लस उमेदवारांच्या तुलनेत अधिक आहे. अर्जेंटिनामधील किमान 40 हजार वृद्धांवर हा अभ्यास करण्यात आला.
न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, स्पुटनिक लाइटची पहिली खेप कसौली येथील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. सुत्रांनी सांगितले की, पॅनेशिया बायोटेकने तयार केलेली लसीची खेप तपासासाठी पाठवण्यात आली आहे. यानंतर चाचणीमध्ये सहभाग घेतलेल्या सहभागींना सुरक्षित पद्धतीने डोस दिले जातील. यापूर्वी रशियन लस स्पुटनिक V ला भारतात मंजुरी मिळाली आहे.