ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर शिरीष कुंदन यांनी केलेल्या टीकेचा वाद अजून शांतही झाला नसताना आता ट्विंकल खन्नाने आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणा-या ट्विंकलने आदित्यनाथ यांना गॅस सोडण्यास उपयोगी आसन करण्याचा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकल बोलत होती.
इंडिया टुडे वुमेन समिटमध्ये उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याबाबत काय विचार आहेत असं ट्विंकलला विचारण्यात आलं होतं. आदित्यनाथ यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांबबात काय वाटतं असं विचारलं असता ट्विंकल म्हणाली, 'योगींनी गॅस सोडण्यास उपयोगी असणार आसन करावं, सिस्टीमसाठी ते खूप चांगलं होईल'. आदित्यनाथांच्या फॅशनबाबतही ट्विंकल म्हणाली. 'योगी फॅशन बदलत आहेत. मी याबाबत एशियन पेंट्सला एक ट्विटही केलं होतं. एशियन पेंट्सने नवा रंग आणण्याची गरज आहे, त्याची टॅगलाइऩ असेल ऑरेंज इज द न्यू ब्राऊन'.
यापुर्वी बॉलीवुडमधील प्रसीद्ध कोरिओग्राफर फराह खानचे पती शिरीष कुंदन यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली होती. परिणामी लखनऊच्या हजरतगंजमध्ये शिरीषविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिरीषने आदित्यनाथ यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. आदित्यनाथ गुंड असल्याची टीका त्यांनी केली होती, त्यानंतर ते ट्वीट त्यांनी डिलीट केलं. 'एखाद्या गुंडाला मुख्यमंत्री बनवणं म्हणजे दाऊद इब्राहिमला सीबीआयचं संचालक आणि विजय माल्ल्याला रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बनवण्यासारखं आहे', असं ट्विट केलं होतं. तर दुस-या एका ट्विटमध्ये 'गुंडाला मुख्यमंत्री बनवून दंगली थांबतील असा विचार करणं म्हणजे बलात्का-याला बलात्काराची परवानगी देऊन त्याला बलात्कार रोखण्यास सांगण्यासारखं आहे', असं म्हटलं होतं.