आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:41 AM2023-08-31T01:41:55+5:302023-08-31T06:35:06+5:30
आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल.
म्हैसूर : काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला दिलेली निवडणूकपूर्व आश्वासने पूर्ण केली आहेत आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांची देशभरात पुनरावृत्ती केली जाईल,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल.
गृहलक्ष्मी : लाखो महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार
अन्नभाग्य : १० किलो तांदूळ
युवा निधी योजना : बेरोजगार पदवीधरांना आणि डिप्लोमाधारकांना क्रमश: ३,००० आणि १,५०० रुपये
गृहलक्ष्मी योजना : १७,५०० कोटी
आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटी आश्वासने देत नाही. काँग्रेस जे बोलते ते करून दाखवतो. कर्नाटकात केलेल्या कामाची संपूर्ण देशात पुनरावृत्ती केली जाईल.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते