Parliament On Mobile: आता लोकसभेची कार्यवाही पाहा मोबाइलवर, लवकरच लॉन्च होणार अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:28 AM2021-07-13T10:28:05+5:302021-07-13T10:28:27+5:30
Parliament Proceedings On Mobile App: अॅपमध्ये लोकसभेच्या लाइव्ह कार्यवाहीसह जुने व्हिडिओ आणि संसद भवनाची लायब्रेरी उपलब्ध असेल.
नवी दिल्लीः आता लोकसभेतील कार्यवाही सर्व सामान्य नागरिकांना त्यांना मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने यासाठी एक अॅप तयार करत आहे, याद्वारे तुम्ही केव्हाही लोकसभेची लाइव्ह कार्यवाही किंवा जुने व्हिडिओही पाहू शकता. लोकसभेत काय घडतयं, हे सामान्य नागरिकांना कळायला हवं. यासाठीच हे अॅप बनवत असल्याची प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दिली.
संसदेची डिजीटल लायब्रेरी
या अॅपवर लोकसभा टीव्हीचे लाइव्ह प्रसारण होईल. तसेच, नागरिकांना संसदेशी संबंधित जुने व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्सही पाहायला मिळतील. याशिवाय, संसदेची लायब्रेरी डिजीटल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. लवकरच ही लायब्रेरी डिजीटल स्वरुपात या अॅपवर टाकली जाईल. लोकसभा अध्यक्षांनी सांगितल्यानुसार, संसद भवनाच्या लायब्रेरीत 1854 नंतर झालेल्या सर्व महत्वाच्या चर्चा\बैठका आणि कार्यवाहीशी संबंधित महत्वाचे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत.
19 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात
येत्या 19 जुलैपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला 18 जुलै रोजी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. लोकसभेत कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना बिरला यांनी दिल्या आहेत. तसेच, व्हॅक्सीनचे डोन डोस घेतलेल्या खासदारांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. पण, एक डोस घेतलेल्या किंवा एकही डोस न घेतलेल्या खासदारांना अधिवेशनास येण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असेल.