लखनौ - एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे. अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, ''भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने भाजपाला 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सांगितले होते. मात्र भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ.''
आता आम्ही निर्णय घेण्यास मोकळे! अपना दल भाजपाची साथ सोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 8:17 AM
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.
ठळक मुद्देएनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी दिला एनडीए सोडण्याचा इशारा केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही अपना दलचा एक मंत्री आहे