आता हम दो हमारा एक... आरोग्य केंद्र देणार संदेश : जि.प.तील कार्यशाळेत वर्षा देशपांडे यांच्या सूचना
By admin | Published: April 29, 2016 12:30 AM
जळगाव : स्त्री जन्मदर वाढावा यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुली असलेल्या दाम्पत्यांचा सत्कार करावा... शक्य झाले तर त्यांना आर्थिक मदत ग्रा.पं., जि.प. आदी यंत्रणांच्या माध्यमातून मिळवून द्यावी... तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी ग्रामस्थांना हम दो... हमारा किंवा हमारी एक..., असा संदेश द्या... याशिवाय मुलगा व मुलगी यांच्या जन्मदरातील मोठी तफावत, विषमता दूर होणार नाही, असे मार्गदर्शन केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणी व मूल्यांकन समितीच्या सदस्य ॲड.वर्षा देशपांडे यांनी जि.प.तील कार्यशाळेत केले.
जळगाव : स्त्री जन्मदर वाढावा यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुली असलेल्या दाम्पत्यांचा सत्कार करावा... शक्य झाले तर त्यांना आर्थिक मदत ग्रा.पं., जि.प. आदी यंत्रणांच्या माध्यमातून मिळवून द्यावी... तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी ग्रामस्थांना हम दो... हमारा किंवा हमारी एक..., असा संदेश द्या... याशिवाय मुलगा व मुलगी यांच्या जन्मदरातील मोठी तफावत, विषमता दूर होणार नाही, असे मार्गदर्शन केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणी व मूल्यांकन समितीच्या सदस्य ॲड.वर्षा देशपांडे यांनी जि.प.तील कार्यशाळेत केले. गुरुवारी सायंकाळी या कार्यशाळेचा समारोप झाला. छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही कार्यशाळा झाली. पीसीपीएनडीटीच्या लेक लाडकी अभियानांतर्गत स्त्री, पुरुष दर विषमता याबाबत माहिती देण्यात आली. शैला जाधव यांनीही कायदेविषयक बाबींची माहिती दिली. जिल्हाभरातील १७५ वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सहायक (स्त्री) आणि मुख्यसेविका या कार्यशाळेला उपस्थित होते. स्त्री भ्रूणहत्येची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती ॲड.देशपांडे यांनी दिली. स्त्री जन्मदर वाढण्यासाठी जागरूकता आणायला हवी. मोठे, छोटे सर्व समाज जागरूक व्हावेत, असे आवाहन करण्यात आले. नवीन दाम्पत्यांना देणार शपथआरोग्य अधिकार्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन नवदाम्पत्यांना आम्ही गर्भलिंग निदान करणार नाहीत, अशी शपथ दिली जावी, अशी सूचना ॲड.देशपांडे यांनी दिली. व्हीलचेअर, स्ट्रेचर वाटपयानिमित्त ५० आरोग्य केंद्रांना व्हीलचेअर व स्ट्रेचरचे वाटप झाले. स्टेट बँकेने ते उपलब्ध करून दिले. व्यासपीठावर ॲड.देशपांडे यांच्यासह शैला जाधव, सभापती सुरेश धनके, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे आदी उपस्थित होते. स्टेट बँँकेने आरोग्य केंद्रांसाठी शवपेट्याही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली.