नवी दिल्ली : दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांतच कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन मी चूक केली; पण पुन्हा तसा वागणार नाही, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा दिल्लीकरांची माफी मागितली आहे़एका वृत्तवाहिनी संकेतस्थळाच्या माध्यमातून केजरीवाल यांनी रविवारी आपली ही भूमिका मांडली़ केजरीवाल यांनी गतवर्षी १४ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. पंतप्रधान बनण्यासाठी मी मुख्यमंत्रिपद सोडल्याचा आरोप माझ्यावर केला गेला; पण असे नव्हते़ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच मी दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती; पण दिल्लीत निवडणुका झाल्या नाहीत़ कदाचित आम्ही अतिविश्वास बाळगून होतो आणि ती एक प्रामाणिक चूक होती, असेही केजरीवाल यांनी म्हटले.जनता मोठी म्हणून क्षमायाचना!आपच्या एका निर्णयाने मनोधैर्य खचल्याचे अनेक दिल्लीकरांना जाणवते आहे़ गत मे महिन्यात यामुळे आम्ही जनतेची क्षमा मागितली होती़ मी पुन्हा एकदा क्षमायाचना करू इच्छितो़ आम्ही खोटे बोलत नाही़ आमच्या निर्णयामुळे लोक अजूनही दुखावलेले आहेत़ मी यासाठी क्षमा मागतो़ कारण आम्ही ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, ती जनता आमच्यापेक्षाही मोठी आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
आता ‘तसे’ वागणार नाही
By admin | Published: February 02, 2015 1:38 AM