इंफाळ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसच्या गोटात धडधड वाढली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. पूर्वेत्तर राज्यातील मणिपूरमध्ये भाजपासोबत आघाडीत असलेल्या नागा पीपल्स फ्रंटने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ने याची घोषणा केली. याबाबत नागा पीपल्स फ्रंटचे प्रवक्ते अचुमबेमे किकोन यांनी सांगितले की, कोहिमा येथील एनपीएफच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर मणिपूरमधील भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरमध्ये सध्या एन. वीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आहे.
लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपाला धक्का, एका मित्रपक्षाने सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 9:46 PM