शिलाँग - गेल्या काही काळात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा आणि एनडीएला सातत्याने पराभव पत्करावा लागला होता. मात्र मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र एनडीएला खूशखबर मिळाली असून, एनडीएतील घटक पक्ष असलेल्या एनपीपीचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी विजय मिळवला आहे. दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीत संगमा यांनी 8 हजार मतांनी विजय मिळवला. या पोटनिवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात मतदान झाले होते. या निकालाबरोबरच मेघालय विधानसभेत एनपीपीची सभासद संख्या 20 वर पोहोचली असून, एनपीपीचे काँग्रेस एवढेच म्हणजे 20 सभासद झाले आहेत.
एनडीएसाठी खूशखबर, मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 1:09 PM