कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:03 PM2024-10-02T17:03:56+5:302024-10-02T17:21:58+5:30

रशियात जाऊन पुतिन यांची भेट घेणारे अजित डोवाल आता फ्रान्सला पोहोचले आहेत...

NSA Ajit Doval meets French President Emmanuel Macron in france and briefs about indian efforts to stop russia ukraine war | कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?

कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?

जेव्हा जेव्हा एखादे प्रकरण अडकते अथवा एखादी समस्या निर्माण होते, तेव्हा तेव्हा भारताचे NSA अजित डोवाल त्यातून मार्ग काढण्यासाठी उभे राहतात. रशिया-युक्रेन युद्ध असो अथवा कुठलाही महत्त्वाचा करार असो, पंतप्रधान मोदींचे संकटमोचक अजित डोभाल सर्वत्र दिसतात आणि मोदींच्या विश्वासावरही खरे उतरतात. रशियात जाऊन पुतिन यांची भेट घेणारे अजित डोवाल आता फ्रान्सला पोहोचले आहेत. 

डोवाल यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा केली. अजित डोवाल यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला दिलेला संदेशही उदृत केला. तसेच, रशिया-युक्रेन युद्ध भारत कशा पद्धतीने संपवू शकतो, यासंदर्भातही डोवाल यांनी मॅक्रॉन यांना संपूर्ण योजना सांगितली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. डोवाल यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना सांगितले की, पीएम मोदींनी दोन्ही देशांना युद्ध संपवून संवादातून शांततेचा मार्ग शोधण्यास सांगितले आहे. अजित डोवाल यांनी मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू आणि परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांचीही भेट घेतली आणि भारताची मनिषा स्पष्ट केली.

मॅक्रॉन आणि डोवाल यांच्यात काय चर्चा झाली? - 
अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊनच फ्रान्सला गेल्याचे सांगण्यात येते. डोवाल यांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत यशस्वी भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्ध, तसेच गाझातील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायल युद्धावरही चर्चा केली. याशिवाय भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक सुधारण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचा शांततेचा संदेश ऐकल्यानंतर, रशिया-युक्रेन युद्धात केवळ भारतच सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असे आता फ्रान्सलाही वाटू लागले आहे.  फ्रान्सचा यावर विश्वासही आहे, कारण पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी युक्रेन आणि रशिया या दोघांनाही भेटून युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: NSA Ajit Doval meets French President Emmanuel Macron in france and briefs about indian efforts to stop russia ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.