हैदराबाद - नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या तेलंगाणा प्रदेशाध्यक्ष बलमुरी व्यंकट नरसिंह राव यांना पोलिसांनी गाढव चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तसेच पोलिसांनी कोर्टात त्यांना १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. दरम्यान, आपल्यावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात आंदोलन केल्याने ही कारवाई करण्यात आली, असा दावा केला आहे.
करीमनगरमधील जम्मिकंता पोलिसांनी राव यांना शुक्रवारी अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी केसीआर यांच्या जन्मदिनी बलमुरी यांनी एनएसयूआयच्या इतर सदस्यांसोबत मिळून आंदोलन केले होते. तसेच गाढवाकडून केक कापून घेतला होता. तसेच त्या गाढवाचा मुख्यमंत्र्यांचा मुखवटा लावला होता.
त्यानंतर हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हे फोटो शेअर केले होते. त्यानंतर टीआरएसचे शहराषध्यक्ष तुंगुतुरी राजकुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यांनी तक्रारीमध्ये दावा केला होता की, गाढवाची चोरी करण्यात आली आहे. मात्र बलमुरी यांनी दावा केला की, त्यांनी गाढव भाड्याने आणले होते. त्याची रक्कमही देण्याच आली होती. तर पोलिसांचे म्हणणे होते की, गाढव चोरून आणण्यात आले होते.
या प्रकरणी तेलंगाणा काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवाणाथ रेड्डी यांनी सांगितले की, विद्यार्थी नेत्यांकडून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी नेत्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थी नाराज होते, असे सांगितले.