रायबरेली- उत्तर प्रदेशमधल्या उंचाहार परिसरातील एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनटीपीसी प्लँटमधील बॉयलरच्या स्टीम पाइपचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उंचाहार एनटीपीसीमध्ये 500 मेगावॉट युनिटमध्ये हा स्फोट झालाय. घटनास्थळावरून आतापर्यंत 16 मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत. दुर्घटनेच्या वेळी तिथे जवळपास 500 मजूर काम करत होते. पॉवर प्लँटमधल्या पाइपलाइनवर मोठा दबाव आल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती रायबरेलीच्या जिल्हाधिका-यांनी दिली आहे. या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या विळख्यात तिथे काम करणारे 20 मजूर सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर 100हून अधिक प्रवासी जखमी आहेत. एनटीपीसी परिसरात सध्या बाहेरील लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधल्या एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, 20 मजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 6:07 PM