शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धुक्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी 33000 अपघात तर 13000 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 1:14 PM

Road accidents:दरवर्षी सुमारे 4.5 लाख अपघात होतात, यात पाऊस आणि अपघातांमुळे होणाऱ्या अपघाचे प्रमाण 9 टक्के.

नवी दिल्ल: जसजसा हिवाळा ऋतू जवळ येत आहे तसतसे धुके पडू लागले आहे. धुक्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी दृश्यमानता कमी झाली आहे. या धुक्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात, यात अनेकांचा मृत्यू होतो, तर बरेचजण गंभीर जखमी होतात. ईस्टर्न पेरिफेरलवर शुक्रवारी सकाळी सुमारे डझनभर वाहनांची धडक झाली. धुक्यामुळे हा अपघात झाला. एका रिपोर्टनुसार, धुक्यांमुळे देशभरात दरवर्षी सुमारे 33,000 रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे 13,000 लोकांचा मृत्यू होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे 9 टक्के मृत्यू हे धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात होतात. ईस्टर्न पेरिफेरलमध्ये धुक्यामुळे शुक्रवारी सुमारे डझनभर वाहने आदळली. त्याचबरोबर द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, धुक्यात दृश्यमानता कमी झाल्यामुळे दरवर्षी रस्ते अपघात होतात. यामध्ये मृत्यूच्या तुलनेत जखमी झालेल्यांची संख्याही दुप्पट आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार एकूण रस्ते अपघातांपैकी 9 टक्के अपघात धुक्यामुळे होतात. जवळपास हाच आकडा पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातांचा आहे. धुक्यामुळे होणा-या रस्ते अपघातात मृतांची संख्या दुप्पट आहे. अहवालानुसार सुमारे 25000 लोक जखमी होतात. 

तज्ञ काय सांगतात ?सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सतीश पांडे सांगतात की, धुक्यात बहुतेक रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळे होतात. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहनांचा वेग ताशी 100 आणि 120 किमी असल्याने अचानक समोर आलेले धुके दिसत नाहीत. अनेकवेळा एखादे वाहन काही कारणास्तव धुक्यात आधीच पार्क केलेले असते, अशा परिस्थितीत पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला पार्क केलेले वाहन दिसत नाही आणि वाहने आदळतात. त्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील वाहनाचा वेग धुक्याच्या काळात 50-60 किमी ठेवावा, जेणेकरून वाहन नियंत्रणात राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेव्हा थांबवता येईल.

 

 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस