नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांखाली घसरली आहे तर या आजाराने मरण पावणाऱ्यांचा दररोजचा आकडा ४००पेक्षा कमी आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ९१.३९ लाख असून, हे प्रमाण ९४.४५ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सोमवारी कोरोनाचे ३२,९८१ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९६,७७,२०३ वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ३९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, बळींची एकूण संख्या १,४०,५७३ झाली. सक्रिय रुग्णांची संख्या ३,९६,७२९ आहे. आतापर्यंत ९१,३९,९०१ जण बरे झाले आहेत.
अमेरिकेत एकाच दिवशी १ लाख लोक रुग्णालयातअमेरिकेमध्ये रविवारी कोरोनाग्रस्तांपैकी १,०१,४८७ जण रुग्णालयात दाखल झाले असून, ही विक्रमी संख्या आहे. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. अमेरिकेत १ कोटी ५१ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ८८ लाख लोक बरे झाले.