रेल्वेस्थानकावर वाढले चोऱ्यांचे प्रमाण
By admin | Published: September 04, 2015 10:45 PM
रेल्वेस्थानकावर वाढले चोऱ्यांचे प्रमाण
रेल्वेस्थानकावर वाढले चोऱ्यांचे प्रमाणयुवकाचे पाकीट लंपास : नेमून दिलेल्या ठिकाणी पोलिसांची अनुपस्थितीनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर चोरट्यांच्या हालचाली वाढल्या असून प्रवाशांचे महागडे मोबाईल, पाकीट पळविण्याच्या घटनात वाढ झाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या चालू तिकीट कार्यालयात आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळील चौकशी कक्षाजवळ ड्युटी लावलेले पोलीस तेथे हजर राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. शुक्रवारी भूषण निमकर (२५) रा. गोपगव्हाण ता. भातुकली जि. अमरावती हा युवक नोकरीच्या प्रशिक्षणासाठी आला होता. त्याला येण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीने त्यास सोमवारी येण्यास सांगितले. त्यामुळे तो आपल्या इतर दोन मित्रासह नागपूर रेल्वेस्थानकावर आला. परतीच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी तो चालू तिकीट कार्यालयात गेला. तेथे त्याने खिशातील पाकीट काढून त्यातून ५०० रुपयाची नोट बाहेर काढली आणि पाकीट खिशात ठेवले. तिकीट खरेदी केल्यानंतर त्याने खिशात हात घातला असता त्याला आपले पाकीट खिशात आढळले नाही. त्याने आजूबाजूला चौकशी केली असता पाकीट कुठेच आढळले नाही. लगेच लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून त्याने याबाबत फिर्याद नोंदविली. या ठिकाणी नेमणूक केलेला एकही पोलीस तेथे यावेळी उपस्थित नसल्याचे या युवकाने सांगितले. चालू तिकीट कार्यालयात नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडत असून पोलीस अनुपस्थित असल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाजवळही अनेकांचे पाकीट, मोबाईल नेहमीच चोरीला जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)......................