गोरखपूर (उत्तर प्रदेश) : गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उत्तरप्रदेश सरकार, तसेच प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अतिशय संतापले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल व केंद्रीय आरोग्य सचिव यांना गोरखपूरला सकाळीच पाठविले. त्यांच्यामार्फत पंतप्रधान सातत्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.बालरोग विभागात आॅक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, नेमके हे मृत्यू कशामुळे झाले, हे सांगण्यास सरकार तयार नाही, तसेच मृतांचे पोस्टमार्टेमही करण्यात आले नाही, असे समजते.या मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या निलंबनाची घोषणा सरकारने केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ आॅगस्ट रोजी हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, त्या दिवशीही ९ रुग्ण मरण पावले होते. त्यांनीच या हॉस्पिटलमध्ये दहा बेडच्या आयसीयूचे, सहा बेडच्या क्रिटिकल केअर युनिटचे उद्घाटन केले होते. जपानी एन्सेफ्लाइटिस व्हायरसने ग्रस्त मुले आणि तीव्र एन्सेफ्लाइटिस सिंड्रोमने (एईएस) आजारी असलेल्या मुलांचीही त्यांनी विचारपूस केली होती. (वृत्तसंस्था)कंपनीने ८ आॅगस्टलाच कळविले होतेआॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाºया लखनौमधील कंपनीने हॉस्पिटलला थकीत रक्कम देण्यासाठी ८ आॅगस्ट रोजी अल्टिमेटम दिला होता. पुष्पा सेल्सच्या प्रतिनिधीने बीआरडी मेडिकल कॉलेजच्या प्रमुखांना लिहिले होते की, ६३ लाख ६५ हजार रुपयांची थकीत रक्कम देण्यात यावी, अन्यथा सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात येईल.भविष्यात आॅक्सिजनचापुरवठा करण्यात असमर्थ असल्याचे पुष्पा सेल्सचेदीपंकर शर्मा यांनी यांनीम्हटले होते. गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी सांगितले की, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे मेडिकल कॉलेजमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, सरकारने आॅक्सिजन कंपनीच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.माहितीच लपविण्याचा केला प्रयत्नया रुग्णालयातील ३0 जण आॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे मरण पावल्याचे वृत्त आल्यावर, राज्य सरकारने असे काहीही घडले नसल्याचा दावा आधी केला. त्यानंतर, केवळ सात जण शुक्रवारी मेले आणि त्याचा आॅक्सिजनशी संबंध नाही, असे सरकारने खुलाशात नमूद केले. मात्र, रुग्णालयात ७ आॅगस्टपासून रोज रुग्ण मरत होते. १0 आॅगस्ट रोजी तर मृतांचा आकडा २३ होता. हे माहीत असतानाही राज्य सरकार मृतांविषयीची माहिती सातत्याने लपवून ठेवू पाहात होते. जेव्हा आकडा ६३ असल्याचे उघडकीस आले, तेव्हा मात्र सरकारच तोंडघशी पडले.
बालमृत्युंचा आकडा ६३, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची सर्व स्तरांतून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 4:25 AM