नवी दिल्ली : देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या रविवारी ८ लाखांपेक्षा कमी होती. कोरोनाचे ६१,८७१ नवे रुग्ण आढळून आल्याने बाधितांचा आकडा ७५ लाखांच्या घरात गेला आहे. बरे झालेल्यांची संख्या सुमारे ६६ लाख असून, हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८८.०३ टक्के आहे.
२२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या प्रत्येकी २० हजारांपेक्षा कमी असून, १० राज्यांत हेच प्रमाण प्रत्येकी २० हजारांपेक्षा अधिक व ५० हजारांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या ३ राज्यांत प्रत्येकी ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर)ने दिलेल्या माहितीनुसार चाचण्यांची एकूण संख्या ९,४२,२४,१९० झाली आहे. रुग्णांची एकूण संख्या - 74,94,551बरे झालेले एकूण रुग्ण - 65,97,209बळींचा एकूण आकडा - 01,14,0311.52% या आजारात मृत्यूदर आहे.उपचार घेणाऱ्यांची संख्या 7,83,313, म्हणजे एकूण रुग्णांच्या 10.45% आहे.