शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी, बरे झाले १ कोटी २ लाख रुग्ण; मृत्यूदर १.४४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 3:10 AM

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १३,८२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १६२ जण मरण पावले. कोरोना बळींची एकूण संख्या आता १,५२,७१८ झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या १,०२,४५,७४१ झाली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाखांपेक्षा कमी असून, बळींच्या संख्येतही घट झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण १ कोटी ६ लाखांच्या घरात असून, त्यातील १ कोटी २ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९६.७० टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १३,८२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १६२ जण मरण पावले. कोरोना बळींची एकूण संख्या आता १,५२,७१८ झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या १,०२,४५,७४१ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के आहे. देशात सध्या १,९७,२०१ कोरोना रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८६ टक्के आहे. अमेरिकेत २ कोटी ४८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १ कोटी ४७ लाख बरे झाले, तर ९६ लाख ११ हजार लोक उपचाराधीन आहेत. अमेरिकेत ४ लाख ११ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, बळींची संख्या ही अमेरिकेपेक्षा कमी आहे. जर्मनीमध्ये कोरोना साथीमुळे घातलेल्या निर्बंधांची मुदत १४ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय त्या देशाच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.जगात कोरोनाचे ९ कोटी ६६ लाख रुग्ण -जगामध्ये कोरोनाचे ९ कोटी ६६ लाख रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ९३ लाख लोक बरे झाले आहेत तर २० लाख ६६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात २ कोटी ५२ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत.

नव्या कोरोना विषाणूचा ६० देशांत संसर्ग -- जिनिव्हा : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जगातील ६० देशांत संसर्ग झाला आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिली. 

- आठवड्यापूर्वी अशा देशांची संख्या ५० होती. कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली असून त्यामुळे २० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीवर काही प्रतिबंधक लसी विकसित झाल्या आहेत. त्यांची लसीकरण मोहीमही सुरू झाली आहे.

- दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू हा अधिक घातक असून, तो २३ देशांमध्ये सापडला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ९३ हजार जणांचा मृत्यू झाला तर ४७ लाख नवे रुग्ण आढळून आले.  अमेरिका, युरोप व भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. भूतान, मालदीवसह काही देशांत लसी रवाना -स्वदेशी बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसी भारताने भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, बांगलादेश, श्रीलंका या देशांना रवाना केल्या आहेत. या माध्यमातून शेजारी देशांसह जगातील इतर देशांबरोबर संबंध अधिक दृढ करण्याची रणनीती केंद्र सरकारने आखली आहे.१,००,००० कोविशिल्ड या लसींचे डोस भूतान व मालदीवला बुधवारी पाठविण्यात आले. या लसींचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटने केले आहे. 

अनेक देशांनी केली विनंती -केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीतून जगाला मुक्त करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांत भारतही सहभागी आहे. कोरोना  लसींचा पुरवठा करावा, अशी विनंती अनेक देशांनी भारताला केल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. तसेच, विविध देशांना कोरोना लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला असून, तो यापुढील काळातही सुरू राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.बर्ड फ्लूवरील प्रभावी लसी द्याचंदीगढ : बर्ड फ्लूच्या एच५एन८ या व अन्य प्रकारच्या विषाणूंचा नायनाट करणाऱ्या लसी अनेक देशांत उपलब्ध आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांना ठार मारण्याऐवजी त्यांना या लसी देण्याचा मार्ग केंद्र सरकारने अवलंबावा तसेच या लसी भारतात आणण्यास परवानगी द्यावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. बर्ड फ्लूवर प्रभावी ठरणाऱ्या लसी तस्करी करून भारतात आणण्याचे प्रकारही घडत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल