शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच; रविवारी राज्यात १६ हजार; तर देशभरात २५ हजार रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 1:35 AM

राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. 

मुंबई/नवी दिल्ली : राज्यातील काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रविवारी १६ हजार ६२० काेराेनाबाधितांचे निदान झाले असून ५० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे काेरोनाबाधितांची एकूण संख्या २३,१४,४१३ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ८६१ आहे, तर मुंबईत दिवसभरात १९०० काेराेना बाधित आढळले असून ७ मृत्यू झाले. (As the number of coronavirus increases; 16,000 in the state on Sunday; An additional 25,000 patients across the country)

राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. 

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांजवळ -मुंबईत रविवारी १ हजार ९६२ नवे काेरोना रुग्ण आढळून आले असून ७ जणांचामृत्यू झाला आहे. मागील काही दिवसातील दैनंदिन काेराेनाबाधितांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

देशात ८४ दिवसांतला उच्चांक - देशभरात रविवारी कोरोनाचे २५ हजार नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ८४ दिवसांतला हा उच्चांक आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख १० हजार ५४४ आहे. त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८५ टक्के आहे. - या संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ९ लाख ८९ हजार असून, त्याचे प्रमाण ९६.७५ टक्के आहे. या प्रमाणात सध्या घट दिसून येत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस