नवी दिल्ली : देशात काेराेनाचा संसर्ग हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र असून, दिवसभरात केवळ २२ हजार ०६५ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील ही नीचांकी रुग्णसंख्या आहे.आराेग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील काेराेना रुग्णसंख्या ९९.०६ लाखांपर्यंत गेली आहे, तर आतापर्यंत ९४.२२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात ३४ हजार ४७७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत काेराेनाच्या १५.५५ काेटी चाचण्या करण्यात आल्या असून, संक्रमणाचे प्रमाण घटून ६.३७ टक्क्यांवर आले आहे. काेराेनामुळे मंगळवारी देशभरात ३५४ मृत्यूंची नाेंद झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्युदर १.४५ टक्के असून, जगात सर्वांत कमी मृत्युदर भारतात आहे.साथ नियंत्रणात, मात्र खबरदारी आवश्यकभारतात ३० जानेवारीला काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. त्यानंतर, संसर्ग झपाट्याने वाढत गेला. काेराेना रुग्णसंख्येमध्ये अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. नव्या रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेनाची साथ नियंत्रणात येत असली, तरीही लाेकसंख्येतील माेठ्या वर्गाला अजूनही धाेका असल्याचे आराेग्य मंत्रालयाने सांगितले आहे.ब्रिटनमध्ये काेराेनाच्या नव्या विषाणूने चिंता ब्रिटनमध्ये काेराेना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवा विषाणू झपाट्याने पसरताे. दक्षिण ब्रिटनमध्ये आतापर्यंत एक हजार रुग्ण सापडले आहेत. या भागात रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. काेविड १९ विषाणूमध्ये जनुकीय बदल झाले आहेत. परंतु, त्याचा धाेका किती आहे, हे स्पष्ट हाेण्यास वेळ लागणार आहे.‘फायझर’च्या लसीला सिंगापूरची मान्यता काेराेनाविरुद्ध ‘फायझर’ कंपनीने तयार केलेल्या लसीला सिंगापूरने मान्यता दिली असून, डिसेंबरच्या अखेरीस लसीची पहिली खेप मिळण्याची अपेक्षा आहे. बरे हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढलेदेशात एकूण सक्रिय रुग्णसंख्या ३ लाख ३९ हजार ८२० एवढी असून, बरे हाेण्याचे प्रमाण ९५.१२ टक्क्यांवर पाेहाेचले आहे.
CoronaVirus News: दिलासादायक! नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पाच महिन्यांतील नीचांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 5:00 AM