लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ब्रिटनमधून भारतात परत आलेल्यांपैकी आणखी १३ जणांना नव्या कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे चाचणीमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे देशातील अशा बाधितांची संख्या बुधवारी ७३ वर पोहोचली आहे.केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनावर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कॉन्सोर्टियम (इन्साकॉग) प्रयोगशाळा या जिनोम सिक्वेंसिंग करून नव्या विषाणूंच्या बाधितांचा शोध घेतात. नव्या कोरोना विषाणूने बाधितांची संख्या वाढत असल्याचे या प्रयोगशाळांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
४१ देशांमध्ये नव्या विषाणूचा संसर्गब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूची जगभरातील ४१ देशांतील लोकांना बाधा झाली आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. मात्र, अन्य ४० देशांत या विषाणूचे मोजक्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू आढळल्याचे त्या देशाने १४ डिसेंबर रोजी जाहीर केले. त्याची संसर्गशक्ती ७० टक्के अधिक आहे. ब्रिटनमध्ये बुधवारपासून संपूर्ण टाळेबंदी लागू झाली आहे.
जर्मनीमध्ये लाॅकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवलाnबर्लिन : ब्रिटनमध्ये काेराेना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर जर्मनीमध्येही संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जर्मनीने लाॅकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. चान्सलर अँजेला मर्केल यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर केला. nलाॅकडाऊनमध्ये काेणालाही १५ किलाेमीटरपेक्षा जास्त अंतरावर प्रवास करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच घराबाहेर एकावेळी एकाच व्यक्तीला भेटता येणार असल्याचे मर्केल यांनी स्पष्ट केले आहे.
बरे होणाऱ्यांची संख्या एक कोटीच्या घरातकोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक कोटीच्या घरात पोहोचली आहे. त्यांचे प्रमाण ९६.३६ %आहे. बुधवारी देशात अवघे१८०८८नवे रुग्ण आढळून आले. बळींची एकूण संख्या दीड लाख झाली आहे.
जगभरात कोरोनाचे ८ कोटी ६८ लाख रुग्ण असून, त्यातील ६ कोटी १६ लाख जण बरे झाले, तर १८ लाख ७७ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात २ कोटी ३३ लाख सक्रिय रुग्ण असून, त्यातील १ लाख लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत २ कोटी १५ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी २८ लाख जण बरे झाले.