लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सतत वाढत असून, हा आकडा आता १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाखांहून जास्त आहे. या संसर्गाने बुधवारी मरण पावलेल्यांचा आकडा ९८ होता व १५ हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले.
अमेरिकेत सुमारे २ कोटी लोक बरे झालेअमेरिकेत २ कोटी ९३ लाख कोरोना रुग्ण असून, बरे झालेल्यांची संख्या सुमारे २ कोटींच्या घरात आहे. ८९ लाख ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ५ लाख २९ हजार जणांचा बळी गेला आहे. ब्राझीलमध्ये १ कोटी ६ लाख कोरोना रुग्ण व बळींची संख्या २ लाख ५७ हजार आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अमेरिकेचा पहिला, भारताचा दुसरा व ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कोरोना रुग्ण, बळींची संख्या कमी आहे. १ कोटी ११ लाखांवरदेशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या११ कोटी ५३ लाख पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण जगामध्ये आहेत.९ कोटी ११ लाख लोक बरे झाले आहेत.२५ लाख ६० हजार लोकांचा बळी गेला आहे. १,६८,०००देशात उपचाराधीन रुग्ण१,०८,१२,०००बरे झालेकोरोना रुग्णांचा मृत्यूदर१.४१%