नवी दिल्ली : देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक विद्यार्थीइंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. तरीही हिंदी माध्यम हे आजही शिक्षणाचे सर्वात मोठे माध्यम आहे. देशातील ४२ टक्के विद्यार्थीहिंदी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यानंतर इंग्रजी आणि बंगाली व मराठी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. (The number of students studying in English medium has increased, with Hindi medium leading, Marathi at number four)ज्या राज्यात स्थानिक भाषेच्या तुलनेत इंग्रजी माध्यमात अधिक विद्यार्थी आहेत त्यात पंजाब, हरयाणा आणि दिल्ली यांच्याशिवाय दक्षिणेतील राज्ये आणि अनेक छोटे राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. २०१९-२० च्या एका अहवालात हा खुलासा झाला आहे. देशातील १५ लाखपेक्षा अधिक शाळांमध्ये प्राथमिकपासून ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत जवळपास २६.५ कोटी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यम निवडण्यात हरयाणात मोठी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये २७.६ टक्के विद्यार्थ्यांच्या तुलनेत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर तेलंगणात २१.७ टक्के वाढ झाली आहे. येथे ७३ टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात. तेलंगणा, आंध्रप्रदेशात स्थानिक भाषा तेलुगुमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे.
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी सर्वाधिक विद्यार्थी ज्या माध्यमात शिकतात ते हिंदी हेच माध्यम आहे. ४२ टक्के संख्या हिंदीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. त्यानंतर इंग्रजी दुसऱ्या स्थानावर, बंगाली तिसऱ्या तर मराठी चौथ्या स्थानावर आहे.
- २६ टक्के देशातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. दिल्लीत - ५९ टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात. जम्मू-काश्मिरात - १०० टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यानंतर तेलंगणात - ७३ टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहेत.