शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

By admin | Published: March 17, 2016 12:38 AM

भाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीभाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी ‘वंदेमातरम्’ आणि ‘भारत माता की जय’वरून या दोन्ही पक्षांवर शरसंधान केले.‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हटले पाहिजे असे भारतीय राज्यघटना किंवा अन्य कोणत्याही नियमावलीत लिहिलेले नाही. परंतु हा नारा स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मनाच्या अभिव्यक्तीच्या रूपात पुढे आला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाप्रति सन्मान आणि समर्पण भाव व्यक्त करण्यासाठी ‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ हे नारे बुलंद करण्यात आले, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे. ‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शमताना दिसत नाही. लेखक आणि खासदार जावेद अख्तर यांनी मंगळवारी ‘भारत माता की जय’ म्हणत ओवैसी यांना प्र त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. ‘कुणाच्या सांगण्यावरून नारा देऊन मला माझी देशभक्ती सिद्ध करावी लागेल काय? असे केलेच पाहिजे हे कोणत्या कायद्यात लिहिले आहे? मी खासदार आहे, मी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि मी संसदेत हजर राहतो. मी संविधानाच्या व्यवस्थेशी बांधील आहे. तरी आमच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे,’ असे ओवैसी म्हणाले होते.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकाचा उल्लेख करताना सिंघवी म्हणाले, या देशाचे लोक, वृक्ष, जंगल, पर्वत, नद्या हे सर्वच भारत माता आहेत. कारण याच धरतीवर हे सर्वकाही विद्यमान आहे. हा देशासाठी समर्पित नारा आहे आणि त्याचा उच्चार करण्यात वाईट काही नाही. उलट हा नारा बुलंद करताना आम्हाला अभिमान वाटतो. परंतु ओवैसी, गिरिराज सिंग, साक्षी महाराज, आजम खान आणि शफिक-उ-रहमान यांच्यासारखे लोक मात्र केवळ ध्रुवीकरणासाठी आणि राजकीय फायदा उकळण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहेत.समाज विभाजन करण्याचा प्रयत्ननिवडणुका जवळ आल्या की हे लोक समाज तोडण्याच्या आपल्या कारवायांना गती देतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत याचा अनुभव आला आहे आणि आता पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.