कोरोनाच्या काळात रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने कोरोना वॉरियर्स असे नाव दिले आहे. कोरोनाचा वेगाने संसर्ग होत असताना, जिथे आपले प्रियजन दूर जात होते, तिथे आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता याच आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेणारे कोणी नाही अशी घटना समोर आली आहे.
कुमारी शहीद निर्मल महातो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मायक्रोबायोलॉजी विभागात लॅब टेक्निशियन कांचन कुमारी मृत्यूशी झुंज देत आहेत. तिला लिव्हर आणि किडनीचा गंभीर आजार आहे. सध्या ती रांची येथील खासगी रुग्णालयात दाखल आहे. सरकारी रुग्णालयांनी हात वर केले आहेत. कांचनचे कुटुंबीय आता सरकार, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांकडे मदतीची याचना करत आहेत.
संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला
कांचन ही कतरासच्या येथील भेलातांड येथील रहिवासी आहे. कांचनचा भाऊ शशीराज चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी त्यांच्या बहिणीला ताप होता. रुग्णालयात तपासणी केली असता तिला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. हळूहळू हा संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला. आता लिव्हर आणि किडनी काम करत नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. सध्या कांचनला रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ती व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी लढा देत आहे.
2 दिवसांत उपचारासाठी दीड लाख रुपये खर्च
7 मे रोजी कांचनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांत दीड लाख रुपये खर्च झाले आहेत. आता घरच्यांकडे उपचारासाठी पैसे नाहीत. कांचन या मायक्रोबायोलॉजी विभागात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. नमुने तपासायची. कोरोनाच्या काळात एका दिवसात 500 हून अधिक नमुने तपासण्याची जबाबदारी होती. शशी यांनी सांगितले की, अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय व्यवस्थापनाने पुढाकार घेतला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.