नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी कोलकाता पोलिसांकडे मदत मागितली आहे. एका व्हिडीओ चॅट अॅपने परवानगी न घेता प्रमोशनसाठी नुसरत जहाँ यांचा फोटो वापरला आहे. अॅपने फोटो वापरल्याने नुसरत यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना टॅग केलं आहे.
नुसरत जहाँ यांनी ट्विटमध्ये जाहिरातीचा स्क्रिनशॉट शेअर केला असून आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. "परवानगी न घेता फोटो वापरणं स्वीकारलं जाऊ शकत नाही. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी विनंती करणार आहोत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण तयार आहोत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली होती. तसेच, बऱ्याचवेळा त्यांनी सोशल मीडियाद्वारे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. नुसरत जहाँ या तृणमूल पक्षाच्या लोकसभेतील खासदार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणतीही अफवा न पसरवता सरकारची मदत केली पाहिजे. सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगत नुसरत जहाँ यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत
अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध
"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"
"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले
मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार