नितीन अग्रवाल - नवी दिल्लीदेशभरातील राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू असलेल्या राजधानीतील ल्युटन नावाने परिचित असलेल्या भागातील वानरसेनेच्या मुक्त संचारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिल्ली भेटीच्या सुरक्षेवरून रामायण घडण्याची चिन्हे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानिमित्त आयोजित केलेल्या ओबामांच्या भेटीसाठी अमाप खर्च करून विविध स्तरीय कडेकोट सुरक्षाकडे तयार करण्यात आले असले, तरी दिल्लीतील माकडे आणि बेवारस कुत्रे त्याला सुरुंग लावूू पाहात आहेत. लंगूरचा आवाज काढण्यासाठी माणसे लागली कामी१नवी दिल्ली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या माकडांना आणखी थोड्या मोठ्या असलेल्या लंगूर वानरांची भीती वाटते. २म्हणूनच वानरसेनेच्या उत्पातापासून बचाव व त्यांच्या या दहशतीला आळा घालण्यासाठी लंगुरांचा वापर केला जातो. त्यासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्यात येते. ३या माकडांना पळविण्यासाठी लंगूर जातीच्या माकडांचा आवाज काढण्याचे काम तूर्तास ४० जणांवर सोपविण्यात आले आहे. अनेकांना काम देण्यात आले आहे. असे ल्युटन झोनमध्ये सुमारे ४० जण कामाला लागले आहेत.जिथे ओबामांचा मुक्काम तिथेही धुमाकूळओबामांचा मुक्काम मौर्य शेरटेन हॉटेलमध्ये असेल. या हॉटेलजवळ जंगलवजा दाट झाडीचा परिसर असून, तेथे अनेक वानरे दिवसभर धुमाकूळ घालत असतात. ल्युटन झोन, विजयपथ आणि राष्ट्रपती भवनच्या पट्ट्यातील रायसीना हिल्स भागातील ही माकडांची दहशत काही नवी बाब नाही. गृह मंत्रालयासह अनेक महत्त्वाची मंत्रालये असलेल्या नॉर्थ ब्लॉक परिसरात माकडांनी मांडलेल्या उच्छादाच्या अनेक कहाण्या सर्वश्रुत आहेत. बेवारस कुत्र्यांनाही रोखायचे कसे ?सरकारी आकड्यांनुसार दिल्लीच्या रस्त्यांवर सुमारे साडेतीन लाख बेवारस कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या कुत्र्यांची संख्या आणि त्रास आटोक्यात ठेवण्याचा भाग म्हणून गेल्या वर्षभरात २८ हजार बेवारस कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव डी़ एम़ सपोलिया यांनी वन, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावत भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी कृती योजना तयार करण्याचा आदेश दिला आहे.४,००० जवानांची सुरक्षाओबामा व त्यांच्या कुटुंबीयांच्या आग्रा व ताजमहाल भेटीदरम्यान त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळण्यास भारताचे चार हजार व अमेरिकेचे १०० जवान तैनात केले जाणार आहेत.
वानरसेनेमुळे ओबामांच्या सुरक्षेत बाधेचे रामायण
By admin | Published: January 22, 2015 3:23 AM