अभेद्य कडे : आग्रा भेटीत चिटपाखरूही घुसू शकणार नाहीआग्रा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आग्रा आणि ताजमहाल भेटीदरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या चार हजार सुरक्षा जवानांसोबत अमेरिकेचे १०० सुरक्षा जवान असणार आहेत.या दौऱ्यात काही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. या शाही कुटुंबाच्या दौऱ्याकरिता आखण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेला अंतिम रूप देण्यासाठी बुधवारी येथे बैठक घेण्यात आली. ओबामा कुटुंब १७ व्या शतकातील या स्मारकाला भेट देणार आहेत. ओबामा २५ जानेवारीला पोहोचत असून, त्याच दिवशी ते मोदी यांच्याशी चर्चा करतील. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत, तर २७ जानेवारीला ते ताजमहाल पाहणार आहेत. च्येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक व काटेकोर असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथे दिली आहे.च्प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान राजपथावर असलेल्या अतिअतिविशिष्ट व्यक्तींच्या कक्षाला सात स्तरीय सुरक्षा वेढा घातला जाणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावरील वायुक्षेत्राची देखरेख विशेषत्वाने लावण्यात आलेल्या रडारद्वारे केली जाणार आहे. सुरक्षिततेचे हे कडे ओबामा यांच्या भेटीदरम्यान जमिनीपासून हवाई क्षेत्रापर्यंत राहणार आहे. च्याविषयी अधिक माहिती देताना सिंह यांनी, एका बहुआयामी नियंत्रण कक्षाद्वारे राजधानीतील प्रत्येक भागात असलेल्या निरीक्षण अभियानावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले. अमेरिकी अध्यक्षांच्या भेटीदरम्यान देशाच्या राजधानीला सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. ओबामांना आमंत्रित करण्याची कल्पना मोदी यांचीच्वॉशिंग्टन : प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. मोदी परराष्ट्र मुद्द्यांवर वेगळ्या रीतीने विचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. च्मोदींनी ही कल्पना आधी निकटवर्तीयांना सांगितली. त्यानंतर भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर यांना याबाबत अमेरिकेचा कल जाणून घेण्यास सांगण्यात आले. जयशंकर यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले.च्प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे म्हणजे मुत्सद्दी संदेश देण्यासारखे आहे. मोदींचा मुत्सद्दी संदेश अमेरिकेच्या पसंतीस उतरला. अमेरिकेने यावर निर्णयासाठी काही वेळ घेतला व अखेरीस जयशंकर यांना होकार कळविला.
ओबामांना ४,००० जवानांची सुरक्षा
By admin | Published: January 22, 2015 1:22 AM