OBC census : ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:00 AM2023-04-18T10:00:33+5:302023-04-18T10:01:03+5:30

OBC census: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती केली आहे.

OBC: Congress aggressive on OBC census, Congress president Kharge's letter to Modi | OBC census : ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र

OBC census : ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र

googlenewsNext

- आदेश रावल 
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती केली आहे. खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जनगणना २०२१ मध्ये होणार होती, ती झाली नाही.

खरगे यांनी म्हटले आहे की, माझी तुम्हाला विनंती आहे की, लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करा आणि २०११ च्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारीदेखील सार्वजनिक करा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटकच्या कोलारमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, २०११ मध्ये काँग्रेसच्या यूपीए सरकारने जातनिहाय जनगणना केली होती. पण, आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. २०२१ मध्ये मोदी सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. आम्ही अशी मागणी करत आहोत की, २०११ च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी. देशात ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती देशाला द्यायला हवी. यासोबतच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवायला हवी. तसेच, दलित, आदिवासींच्या संख्येनुसार त्यांना आरक्षण मिळायला हवे. राहुल गांधी यांनी कोलारमध्ये घोषणा केली होती की, जेवढी लोकसंख्या, तितका हक्क.

२०१९ मधील भाषण अन्
 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील कोलारमध्ये भाषण केले होते. त्यामुळे सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते.
 तर, भाजपने म्हटले होते की, राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाचा अपमान केला आहे. आता राहुल गांधी यांनी कोलारमध्येच ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Web Title: OBC: Congress aggressive on OBC census, Congress president Kharge's letter to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.