शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

OBC census : ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:00 AM

OBC census: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती केली आहे.

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती केली आहे. खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जनगणना २०२१ मध्ये होणार होती, ती झाली नाही.

खरगे यांनी म्हटले आहे की, माझी तुम्हाला विनंती आहे की, लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करा आणि २०११ च्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारीदेखील सार्वजनिक करा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटकच्या कोलारमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, २०११ मध्ये काँग्रेसच्या यूपीए सरकारने जातनिहाय जनगणना केली होती. पण, आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. २०२१ मध्ये मोदी सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. आम्ही अशी मागणी करत आहोत की, २०११ च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी. देशात ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती देशाला द्यायला हवी. यासोबतच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवायला हवी. तसेच, दलित, आदिवासींच्या संख्येनुसार त्यांना आरक्षण मिळायला हवे. राहुल गांधी यांनी कोलारमध्ये घोषणा केली होती की, जेवढी लोकसंख्या, तितका हक्क.

२०१९ मधील भाषण अन् २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील कोलारमध्ये भाषण केले होते. त्यामुळे सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. तर, भाजपने म्हटले होते की, राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाचा अपमान केला आहे. आता राहुल गांधी यांनी कोलारमध्येच ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जातीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे