नवी दिल्लीः सैनिकी शाळांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के जागा आरक्षित असणार आहेत. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सोबत त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेले परिपत्रकही जोडले आहे. यानुसार सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा या ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात ती शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. तर उर्वरित ३३ टक्के जागा या बाहेरील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.
सैनिकी शाळांमध्ये आता ओबीसी आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:41 AM