शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

नवोदयमध्ये ओबीसींना मिळतील राखीव जागा!

By admin | Published: January 18, 2017 5:11 AM

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसणे हे नियमांविरुद्ध आहे व ही त्रुटी नजीकच्या काळात दूर केली जाईल, असे या खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी सांगितले. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जवळपास ६०० जवाहर नवोदय विद्यालयांत राखीव जागांची तरतूद लागू न करणे हे योग्य नाही, असे मला जाणवले. ही त्रुटी दूर केली जाईल, असे कुशवाह यांनी येथे राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात बोलताना सांगितले. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर या वेळी उपस्थित होते. कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष असून, तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका येत्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असून, कुशवाह यांच्यावरील विधानाचे महत्त्व त्या पार्श्वभूमीवर आहे. जावडेकर म्हणाले की, नवोदय विद्यालयांतील प्रवेश या वर्षी स्पर्धा परीक्षांद्वारे झाले. २२ लाख मुलांनी त्यासाठी अर्ज केला होता. त्यातून ४० हजार मुलांची निवड झाली. अनुसूचित जातींसाठी या विद्यालयांत कमी राखीव जागा असल्या, तरी या वर्गांतील विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्के आहे. अनुसूचित जमातींसाठी सात टक्के राखीव जागा असून, १९ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. जात, पंथ निकषांवर आलेले नसून, या विद्यार्थ्यांनी निव्वळ गुणवत्तेवर प्रवेश मिळवले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>निसर्गाने भेदभाव केलेला नाही...जवाहर नवोदय विद्यालयांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमधील गुणांत फार काही मोठा फरक नाही, असे जावडेकर म्हणाले. निसर्गाने जातीचा आधार घेऊन बुद्धी देताना भेदभाव केलेला नाही हे आम्ही समजून घ्यायला हवे.प्रत्येक जण बुद्धीमान असून, कोण संधी घेतो आणि कोण कठोर परिश्रम करतो हा प्रश्न आहे. सगळ््यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे यावर जावडेकर यांनी भर दिला. २०१७ यावर्षात मोदी सरकारने ६२ नव्या जवाहर नवोदय विद्यालयांची घोषणा केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.