सिमला : हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कासोलचा एक व्हिडीओ समोर आला असून, ज्यात काही पर्यटक अश्लील नृत्य करताना आणि अमली पदार्थ घेताना दिसत आहेत. त्यामुळे मात्र उत्तराखंडला ‘देवभूमी’ मानणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘नग्नता, अश्लीलता, ड्रग्ज यांचे मिश्रण. हिमाचल प्रदेशचे रहिवासी राज्याला देवभूमी म्हणतात, परंतु कासोल पार्वती खोऱ्यात असे दृश्य सर्रास पाहायला मिळत आहे. काही पैशांसाठी सभ्यता आणि संस्कृती नष्ट करणे योग्य आहे का? हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कासोल परिसरातील अशा कृत्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. कासोलला बहुतेक परदेशी पर्यटक येतात. इस्रायलच्या लोकांची ही पहिली पसंती आहे. ड्रग्जमुळे हे क्षेत्र कुप्रसिद्ध झाले आहे.