नवी दिल्ली : व्यापमं घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने रविवारी मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्या माजी ओएसडीसह ३८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या निवडीत झालेल्या कथित गैरप्रकाराबाबत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.विशेष टास्क फोर्सने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर आयपीसी अंतर्गत गुन्हेगारी कट, फसवणूक, लबाडी, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. ज्या ३८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
व्यापमं : आणखी एक एफआयआर
By admin | Published: July 26, 2015 11:36 PM