Odisha Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह भाजपने गेल्या 24 वर्षांपासून राज्यात असलेली बीजू जनता दलाची सत्ता उलथून लावली. 147 जागांपैकी भाजपने 78 जागा मिळवल्या. आज या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि 13 मंत्र्यांचाही शपथविधी झाला. माझी यांच्या मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
नवीन पटनायक 2000 पासून 2024 पर्यंत, म्हणजेच 24 वर्षे 97 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच राज्यात भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळाही खास होता. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पटनागचे आमदार के.व्ही.सिंग देव आणि निमापारा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झालेल्या आमदार प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जनता मैदानावर राज्यपाल रघुबर दास यांनी त्यांना गोपनीयतेची आणि पदाची शपथ दिली.
या दिग्गजांनी उपस्थितीपूर्वेकडील या राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, जुआल ओरम, अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित होते. ओडिशाचे निवर्तमान मुख्यमंत्री नवीन पटनायकदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
- मुख्यमंत्री- मोहन चरण माझी
- उपमुख्यमंत्री- कनकवर्धन सिंह देव
- उपमुख्यमंत्री- प्रवती परिदा
- कॅबिनेट मंत्री- सुरेश पुजारी
- कॅबिनेट मंत्री- रवीनारायण नाईक
- कॅबिनेट मंत्री- नित्यानंद गोंड
- कॅबिनेट मंत्री- कृष्ण चंद्र पात्रा
- कॅबिनेट मंत्री- पृथ्वीराज हरिचंदन महापात्रा
- कॅबिनेट मंत्री- मुकेश महालिंग
- कॅबिनेट मंत्री- बिभूती भूषण जेना
- कॅबिनेट मंत्री- कृष्णचंद्र महापात्रा
- राज्यमंत्री- गणेश रामसिंह खुंटिया
- राज्यमंत्री- सूर्यवंशी सूरज
- राज्यमंत्री- प्रदीप बालसामंता
- राज्यमंत्री- गोकुळ नंदर मल्लिक
- राज्यमंत्री - संपद कुमार सेविन