ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 06:11 AM2024-06-09T06:11:01+5:302024-06-09T06:11:48+5:30

Odisha Assembly Election 2024 Result: ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे.

Odisha Assembly Election 2024 Result: 73 percent of Odisha's new MLAs are millionaires | ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

भुवनेश्वर : ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे. ओडिशा विधानसभेत एकूण १४७ सदस्य आहेत. या निवडणुकीत महिला आमदारांची संख्या घटली आहे.

कोणत्या पक्षाचे करोडपती आमदार? 
nराज्यातील १०७ करोडपती आमदारांपैकी ५२ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे, ४३ बीजेडीचे, नऊ काँग्रेसचे, एक माकप आणि दोन अपक्ष उमेदवार आहेत. 
n२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७८ विधानसभा जागा जिंकल्या आहेत, तर बीजेडीने ५१, काँग्रेस १४ आणि तीन अपक्ष उमेदवार जिंकले आहेत, तर एक माकपने आणि दोन अपक्ष निवडून आले आहेत.

आमदारांची सरासरी मालमत्ता किती? 
ओडिशा विधानसभा निवडणुकीत प्रत्येक विजयी उमेदवाराची सरासरी मालमत्ता ७.३७ कोटी रुपये आहे, तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ती ४,४१ कोटी रुपये होती. चंपुवाचे आमदार सनातन महाकुड (बीजेडी) हे विजयी आमदारांमध्ये सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकूण २२७.६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. बालासोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या बीजेडीच्या सुबासिनी जेना या १३५.१७ कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत आमदार आहेत.

१४७ विजयी उमेदवारांपैकी ८५ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
६७ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
४६ भाजपच्या, तर बीजेडीच्या १२ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
५ काँग्रेसच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत.

Web Title: Odisha Assembly Election 2024 Result: 73 percent of Odisha's new MLAs are millionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.