ओदिशा विधानसभेमध्ये रणकंदन, अध्यक्षांच्या आसनालाच विरोधकांनी घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:44 AM2024-08-23T11:44:07+5:302024-08-23T11:50:55+5:30
Odisha Assembly News: विषारी दारूच्या प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंवरून आज ओदिशाच्या विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांमधील काही आमदार एवढे आक्रमक झाले की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. तसेच अध्यक्षांच्या आसनाला घेराव घातला.
विषारी दारूच्या प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंवरून आज ओदिशाच्या विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षांमधील काही आमदार एवढे आक्रमक झाले की, त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेतली. तसेच अध्यक्षांच्या आसनाला घेराव घातला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांच्या आसनाभोवती आमदार गोळा झाल्याचे आणि सुरक्षा रक्षक त्यांना दूर लोटत असल्याचे दिसत आहे.
ओदिशा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षांनी विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बीजेडी आणि काँग्रेसचे नेते वेलमध्ये उतरले. त्यांनी गंजम जिल्ह्यातील विषारी दारू कांडावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच राज्याच्या अबकारी कर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
#WATCH | Odisha | BJD and Congress leaders come into the well of the House and create a ruckus over the liquor tragedy in Ganjam district, during the Budget session of Odisha Assembly. The opposition is also demanding the resignation of the State Excise Minister.
— ANI (@ANI) August 23, 2024
(Video source:… pic.twitter.com/P8Tdh8VI08
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुरमा पाढी ह्या ओदिशाच्या विधानसभेच्या अध्यक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओदिशामध्ये भाजपाला पहिल्यांदाच बहुमत मिळाले होते. त्यानंतर सुरमा पाढी यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती.