मंदिरातचोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण एका चोरानेमंदिरातूनचोरी केलेले दागिने परत केल्याची घटना समोर आली आहे. ओडिशातील गोपीनाथपूर येथील गोपीनाथ मंदिरातून भगवान कृष्णाचे दागिने चोरणाऱ्या एका चोराने 9 वर्षांनंतर ते परत केले. चोरी केल्यापासून दररोज त्याला भयानक स्वप्ने यायची, असेही त्याने सांगितले.
चोराने 9 वर्षांपूर्वी मंदिरातून चोरी श्रीकृष्णाचे दागिने चोरले, यानंतर त्याला वाईट स्वप्नांनी पछाडले. यामुळे घाबरलेल्या चोराने देवाचे दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका कापडात दागिने आणि एक निनावी चिठ्ठी सोडली. त्यात त्याने लिहिले की, "2014 मध्ये मंदिरात एका यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मी त्या कार्यक्रमादरम्यान देवाचे दागिने चोरले. तेव्हापासून मला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मी आता ते दागिने परत करण्याचा निर्णय घेत आहे.''
चोराने अलीकडच्या काळात श्रीमद भगवद्गीता वाचली होती, त्यामुळे त्याला आपल्या चूक झाल्याचे समजले. यानंतर त्याने श्रीकृष्णाचे लाखो रुपयांचे दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. त्याने मंदिरासमोर गुपचूप एका पिशवीत डोक्याचे मुकूट, कानातले, बांगड्या आणि बासरी ठेवली. या चिठ्ठीत त्याने पुजारी देबेश चंद्र मोहंती यांचाही उल्लेख केला. त्याने दागिन्यांसह अतिरिक्त 300 रुपये प्रायश्चित्त म्हणून सोडले.
चोरीचे दागिने परत मिळाल्याने मंदिर प्रशासन आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चोर भगवान कृष्णाच्या शिकवणीने प्रभावित झाला आणि त्यामुळेच त्याने दागिने परत केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या घटनेची गावात मोठी चर्चा होत आहे.