ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:08 AM2019-02-09T05:08:39+5:302019-02-09T10:28:54+5:30

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Odisha to play in tri-series BJP's dilemma | ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था

ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था

Next

- रवी टाले

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला बसलेला हादरा व उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीचे एकत्र जबर आव्हान, या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने ‘लूक ईस्ट पॉलिसी’ अवलंबली आहे. त्यामध्ये ओडिशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत २१ सदस्य पाठविणाऱ्या ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होत आहे. तब्बल १९ वर्षांपासून सलग एकहाती सत्ता बिजू जनता दलाला सत्तेतून काढण्याचा भाजपा नेतृत्वाचा मनसुबा आहे. काही वर्षांपूर्वी बिजदसोबत युती असलेल्या भाजपाने राज्यात प्रभाव वाढवत, कधीकाळी प्रबळ असलेल्या कॉंग्रेसला तिसºया क्रमांकावर पोहोचविले आहे. मात्र लोकसभेतील संख्याबळ वाढविण्यासाठी कॉंग्रेसचेही लक्ष ओडिशावर आहे. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

तिरंगी लढती व सुमारे दोन दशके सत्तेत असल्याने बिजदला करावा लागणार असलेला सत्ताविरोधी लहरीचा सामना, यामुळे या राज्यात चांगली संधी असल्याचे भाजपाला वाटते. जनतेने अनेक वर्षे कॉंग्रेसला व नंतर बिजदला १९ वर्षे संधी दिली असून, आता आम्हाला पाच वर्षांसाठी संधी दिल्यास आम्ही ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवू, यावर भाजपाचा जोर आहे.

आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी भाजपाला बिजदविरोधात आघाडी उघडण्याची गरज आहे; मात्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ते करताना दिसत नाही. त्यामागचे कारण भाजपा नेतृत्वाला बिजदचे नेते नवीन पटनायक यांना दुखवायचे नाही. बहुमतासाठी जागा कमी पडल्यास, बिजद मदत करू शकेल, असे भाजपाला वाटते.

या द्विधा मनस्थितीचा भाजपाला फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुसरे कारण भाजपाला सारी मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मात्र मोदीच व्यक्तिश: नवीन पटनायक सरकारवर तुटून पडण्याचे टाळत आहेत. आपल्या तिन्ही दौºयात त्यांनी पटनायक सरकारवर कठोर टीका केली नाही.

भाजपा व कॉंग्रेसपासून समान अंतर राखण्याचे पटनायक यांचे धोरण असले तरी, तिसºया आघाडीबाबतही ते उत्सुक नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गैरभाजपा, गैरकॉंग्रेस आघाडीच्या प्रस्तावाला पटनायक यांचा प्रतिसाद थंड होता. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना पाठिंबा, मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी त्यांच्या खासदारांचे बहिर्गमन, मोदी सरकारच्या अनेक विधेयकांना पाठिंबा, या कृतींतून आपल्याला भाजपाचे वावडे नसल्याचे त्यांनी दाखवून दिले मात्र महानदी पाणीवाटप वा ओडिशाला विशेष दजाच्या मागणीवरून त्यांनी मोदींवर टीकाही केली. या मुद्यांद्वारे मतांची बेगमी करता येते, हे त्यांनी बरोबर ओळखले आहे.

काँग्रेस द्विधा मन:स्थितीत नाही

काँग्रेसला भाजपाविरोधात मिळतील तेवढ्या पक्षांची साथ हवीच असली आहे. पण पटनायकविरोधात आघाडीसाठी भाजपाप्रमाणे काँग्रेस द्विधा मन:स्थितीत दिसत नाही. राहुल गांधी यांनी जानेवारीत ओडिशाला भेट दिली, तेव्हा त्यांनी भाजपा व बिजदवरही टीकास्त्र डागले. आपल्याला भाजपा आणि बिजद यांच्याशी लढा द्यायचा असल्याचे त्यांच्या टीकेतून स्पष्टपणे दिसले. त्यामुळे राज्यात तिरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.

एकूण जागा : लोकसभा - २१

बिजद ९

भाजपा ७
कॉँग्रेस ५

एकूण जागा : विधानसभा - १४७

बिजद ११८

कॉँग्रेस १५

भाजपा १०

अन्य ४

Web Title: Odisha to play in tri-series BJP's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.