शहरं
Join us  
Trending Stories
1
८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला
2
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
3
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
4
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, २ वर्षांपूर्वी लग्न; कुलगाममध्ये शहीद प्रदीप यांची पत्नी गर्भवती
5
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
6
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
7
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
8
MS Dhoni Birthday : माहीच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन! पत्नी साक्षी धोनीच्या एका कृतीनं जिंकली मनं, Video
9
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
10
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
11
"ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", 'धर्मवीर २'चा जबरदस्त टीझर
12
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
13
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
14
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
15
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
16
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
17
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
18
ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण
19
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
20
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पुतिनला 'दहशतवादी' म्हणणाऱ्या खासदाराचा भारतात संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 3:39 PM

ओडिशातील रायगडमध्ये दोन रशियन पर्यटकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे दोघे मित्र असून, यातील एक रशियन खासदार होते.

ओडिशातील रायगडमध्ये दोन रशियन पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला तर दोन दिवसांपूर्वीच त्याचा मित्रही मृतावस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी सांगितले की, 65 वर्षीय पावेल अँथोम शनिवारी हॉटेलबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पावेलचा सहप्रवासी व्लादिमीर बिदेनोव 22 डिसेंबर रोजी त्याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. 

मृतापैकी एक रशियन खासदारमीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत रशियन पर्यटकांपैकी एक पावेल अँटोनोव्ह हा रशियन खासदार असून, ते राष्ट्राध्यक्ष पुतीनचे कट्टर टीकाकारही होते. या घटनेला हा नवीन अँगल जोडल्यानंतर पोलिसही अलर्ट झाले आहेत. पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मोठे विरोधक मानले जातात. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा अँटोनोव्हने पुतिनला दहशतवादी म्हटले होते. दरम्यान, अँटोनोव्हचा मित्र व्लादिमीर यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

दोन्ही मित्र नशेत होतेव्लादिमीर आणि अँटोनोव्ह यांच्यासह चार रशियन पर्यटकांनी 21 डिसेंबर रोजी कंधमाल जिल्ह्यातील दरिंगबाडीला भेट दिल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केले होते. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सांगितले की, पर्यटकांनी दुपारी 4.30 च्या सुमारास चेक इन केले आणि ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. त्यापैकी बी व्लादिमीरचा रात्री मृत्यू झाला. पावेल आणि अँटोनोव्ह एकाच रुममध्ये राहत होता.

मित्राच्या मृत्यूनंतर अँटोनोव्ह दुःखी ?तपास अधिकारी एसपी विवेकानंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर व्लादिमीर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्राच्या मृत्यूमुळे रशियन खासदार पावेल अँटोनोव्ह खूप दुःखी होते आणि यातच त्यांनी 25 डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याचा संशय आहे. तरीदेखील पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत. 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनOdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी