शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Odisha Forest Fire: सिमलीपाल जंगलाला भीषण आग, 11 दिवसांपासून जळतंय 'हत्ती' अन् 'वाघां'चं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 2:38 AM

यूनेस्‍कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्‍ड नेटवर्क ऑफ बायोस्‍पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे. (Odisha Simlipal forest fire)

ठळक मुद्देया नॅशनल पार्कला गेल्या 11 दिवसांपासून भीषण आग लागली आहे.हे जंगल आशियाई हत्ती, बंगाल टायगर आणि चार शिंगे असलेल्या हरणांचे (Four-horned antelope) घर आहे.सिमलीपाल जंग म्हणजे, तब्बल 1060 स्‍क्‍वेअर मिटरमध्ये पसरलेला देशातील सर्वात महत्वाचा नॅशनल पार्क

भुवनेश्वर - ओडिशातील (Odisha) मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल नॅशनल पार्क (Simlipal forest) सध्या आगीत जळत आहे. या नॅशनल पार्कला गेल्या 11 दिवसांपासून भीषण आग (fire) लागली आहे. आशियाई हत्ती, बंगाल टायगर आणि चार शिंगे असलेल्या हरणांचे (Four-horned antelope) घर असलेले हे सिमलीपाल जंग म्हणजे, तब्बल 1060 स्‍क्‍वेअर मिटरमध्ये पसरलेला देशातील सर्वात महत्वाचा नॅशनल पार्क आहे. (Odisha Simlipal forest fire its really a matter of concern)

मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा भाग - हा पार्क म्हणजे मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा भाग आहे. याच बरोबर टायगर रिझर्व्हदेखील आहे. एवढेच नाही, तर हा पार्क जोरांदा आणि बेरीपानी फॉल्‍स सारख्या सुंदर सरोवरांसाठीही प्रसिद्ध आहे. यूनेस्‍कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्‍ड नेटवर्क ऑफ बायोस्‍पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे. 

3000 प्रकारची झाडं अन् वनस्पती -गेल्या 10 दिवसांपासून या जंगलाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पार्कमध्ये एकूण 399 फायर पॉइंट्सची ओळख झाली आहे. हा पार्क लाल सिल्‍क कॉटन झाडांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे याच झाडांवरून या पार्कला नाव मिळाले आहे. कारण ही झाडे याच भागात बघायला मिळतात. या जंगलात 3000 प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. यात 94 प्रकारच्या प्रजाती एकट्या ऑर्किडच्या आढळून येतात.

विशेष म्हणजे या जंगलात अथवा नॅशनल पार्कमध्ये पानी आणि जमिनीवर राहू शकतील असे 12 प्रकारचे प्राणी, 29 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 264 प्रकारचे पक्षी आणि 42 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.

Odisha Forest Fire: ओडिशात जंगल पेटलं, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'स्पेशल टास्क फोर्स' 

फेब्रुवारी महिना सर्वात घातक -सिमलीपाल फॉरेस्‍ट रिझर्व्हमध्ये शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांत आग लागते. वसंत ऋतूच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातील या नेशनल पार्कमध्ये अशा प्रकारच्या घटना शक्यतो घडतात. मात्र, शक्यतो मानवी चुकांमुळे आग लागण्यासारख्या घटना घडतात, असे सांगितले जाते. 

1000 कर्मचारी, 250 फॉरेस्‍ट गार्ड्स आग विझविण्याच्या कामात -माध्यमांतील माहितीनुसार, 1000 कर्मचारी आणि 250 फॉरेस्‍ट गार्ड्स आग विझविण्याच्या कामात लावण्यात आले आहेत. तसेच 45 अग्नीशमन दलाच्या  गाड्या आणि 240 ब्‍लोअर मशीनच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

जंगलाचा मुख्य भाग सुरक्षित -नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलाचा मुख्य भाग सुरक्षित आहे आणि संरक्षित प्रजातींना या घटनेमुळे कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचलेले नाही. ही आग बफर झोनमध्ये लागली होती आणि फुटहील एरिया सध्या नियंत्रणात आहे.

टॅग्स :Odishaओदिशाforestजंगलforest departmentवनविभागfireआगFire Brigadeअग्निशमन दलTigerवाघ