शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Coromandal Train Accident: ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 9:00 PM

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोषींवर कडक कारवाच्या सूचना दिल्या आहेत.

Coromandal Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये बंगळुरू-हावडा कोरोमंडल सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेन थांबलेल्या मालगाडीवर धडकून पटरीवरुन उतरली. अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीत तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 280+ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातमी- गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी काल अपघातस्थळी भेट दिली. रेल्वेमंत्री दोन दिवसांपासून घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, याची माहितीही त्यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशाचे माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातही अनेक अपघात झाले आहेत.

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना 54 रेल्वे अपघात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. तसेच, त्यांच्या काळात एकूण 54 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 839 गाड्या रुळावरून घसरल्या आणि यात 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी मंत्री झाल्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत डझनभर मोठ्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

नितीश रेल्वेमंत्री असताना 79 रेल्वे अपघात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 19 मार्च 1999 ते ऑगस्ट 1999 पर्यंत म्हणजे फक्त 139 दिवस आणि पुन्हा 20 मार्च 2001 ते 22 मे 2004 पर्यंत म्हणजे 3 वर्षे 63 दिवस रेल्वे मंत्री म्हणून काम केले. त्यादरम्यान 79 रेल्वे अपघात झाले, तर 1000 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये सुमारे 1527 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट 1999 मध्ये आसाममध्ये गॅसल ट्रेन अपघातात किमान 290 प्रवासी ठार झाले होते.

संबंधित बातमी- LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

लालू यादव रेल्वेमंत्री असताना 51 रेल्वे अपघात 

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 22 मे 2004 ते 22 मे 2009 या कालावधीसाठी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेसाठी खूप काम केले, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. पण, यादरम्यान 51 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि 550 गाड्या रुळावरून घसरल्या. या अपघातांमध्ये 1159 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातNitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव