शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Odisha Train Accident: इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड? बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 11:16 AM

ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास सुरू आहे. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Odisha Train Accident: ओडिशा येथील बालोसोर ट्रेन अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यात ११०० जण जखमी झाले आहेत, या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे रेल्वेच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचे पुरावेही सापडल्याचे तपासात सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्वाधिक चर्चा या इंटरलॉकिंग प्रणालीची झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्राथमिक तपासाच्या आधारे या यंत्रणेत गडबड असण्याची शक्यता व्यक्त केली होती.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी

सीआरबी रेल्वेने पंतप्रधान कार्यालयाला अपघाताची माहिती दिली आहे. अपघाताबाबत रेल्वेने भीती व्यक्त केली आहे की, जी काही घटना घडली, ती पॉइंट बदलल्यामुळे घडली आहे. पीएमओला सांगण्यात आले की, रेल्वेला असे वाटते की हे सर्व मुद्दाम केले आहे किंवा एखाद्याने केले आहे ज्याला या मुद्द्याची पूर्ण माहिती आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, प्राथमिक तपासणीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये छेडछाड केल्याचा स्पष्ट पुरावा आढळला आहे. सीबीआयच्या तपासात याबाबत आणखी काही खुलासे होतील. या अपघातामागे कोणाचा हात आहे, हा अपघात कोणी घडवून आणला, अपघात कसा घडला याचा शोध सीबीआय घेईल.

"इंटरलॉकिंग सिस्टम ही सिग्नलिंगची एक अतिशय सुरक्षित पद्धत आहे. याला 'फेल सेफ' म्हणतात, याचा अर्थ असा की जर सिस्टीममध्ये बिघाड झाला, तर सर्व सिग्नल लाल होतील आणि सर्व गाड्या थांबतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोणीतरी या इंटरलॉकिंग प्रणालीशी जाणीवपूर्वक छेडछाड करत नाही, तोपर्यंत मेन लाइनसाठी नियुक्त केलेली लाईन लूप लाइनने बदलणे शक्य नाही. यावर  तपास करावा, अशी शिफारस अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय रेल्वे वापरत असलेल्या इंटरलॉकिंग सिस्टमला चार प्रमाणपत्रे आहेत आणि ती १०० टक्के सुरक्षित मानली जाते.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAccidentअपघातrailwayरेल्वे